esakal | CoronaVirus  ः औरंगाबादेत ३२ तासांत बारा जणांचे मृत्यू , आज १२६ बाधीत
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

आता जिल्ह्यात एकुण मृतांचा आकडा २०३ वर गेला आहे. घाटी रुग्णालयात १४८, खासगी रुग्णालयात ५३ व जिल्हा रुग्णालय येथे एक रुग्णाचा मृतात समावेश आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली. 

CoronaVirus  ः औरंगाबादेत ३२ तासांत बारा जणांचे मृत्यू , आज १२६ बाधीत

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  ः औरंगाबादेत कोरोनासह इतर व्याधींनी होणाऱ्या बळींची संख्या २०३ झाली आहे. बत्तीस तासांमध्ये १२ जणांचे मृत्यू झाले असुन रविवारी (ता. २१) सात व सोमवारी (ता. २२) पाच जणांचे बळी गेले. यात आठ पुरुष व चार महिला आहेत. आज झालेल्या मृत्यूत आठ घाटी व चार खासगी रुग्णालयात झाले आहेत. 

आता जिल्ह्यात एकुण मृतांचा आकडा २०३ वर गेला आहे. घाटी रुग्णालयात १४८, खासगी रुग्णालयात ५३ व जिल्हा रुग्णालय येथे एक रुग्णाचा मृतात समावेश आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील मृत्यू 
 

 • रोशनगेट येथील ७३ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १७ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटिव्ह आला. रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • गारखेडा येथील ७० वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १६ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १७ जूनला पॉझिटिव्ह आला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • कैसर कॉलनीतील २५ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १४ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १६ जूनला पॉझिटिव्ह आला. त्यांचा रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • हनुमाननगर, पुंडलिकनगर येथील ३६ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १७ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटिव्ह आला. रविवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १३ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटिव्ह आला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • राजा बाजार येथील ६२ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १४ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २० जूनला पॉझिटिव्ह आला. सोमवारी पहाटे पाऊने चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • उत्तमनगर येथील ४९ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १० जूनला दाखल केले. त्यांचा ११ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी सकाळी पाऊने आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • कोहीनुर कॉलनी येथील ५९ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १३ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १४ जूनला पॉझिटिव्ह आला. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • खासगी रुग्णालयात चौघांचा मृत्यू 
 • बायजीपुरा येथील ६५ वर्षीय पुरुषाला खासगी रुग्णालयात ९ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल ११ जूनला पॉझिटिव्ह आला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
 • सिडको एन-९ येथील ६५ वर्षीय पुरुषाला खासगी रुग्णालयात १७ जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटिव्ह आला. त्यांचा रविवारी रात्री साडेअकराच्‍या सुमारास मृत्यू झाला. 
 • हर्सुल येथील ७१ वर्षीय पुरुषाला खासगी रुग्णालयात १५ जूनला दाखल केले.
 • त्याआधी ते घाटी रुग्णालयात भरती होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आठ जूनला पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा सोमवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास मृत्यू झाला. 
 • पैठणगेट येथील ३१ वर्षीय महिलेला खासगी रुग्णालयात पाच जूनला दाखल केले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सात जूनला पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मृत्यू झाला. 
 • आज १२६ कोरोनाबाधित 

औरंगाबादेत आतापर्यंत सर्वात जास्त एकाच दिवशी १७० रुग्ण रविवारी (ता. २१) आढळून आले. त्यानंतर आज (ता. २२) १२६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता एकूण १ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज १२६ रूग्णांची भर पडल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ६५६ झाली आहे. यापैकी २ हजार ४६ जणांना सुटी देण्यात आली आहे. 

आज आढळलेले १२६ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) - 

बारी कॉलनी (१), वाळूज (३), गजानन नगर (३), गजगाव, गंगापूर (१), न्याय नगर, गारखेडा परिसर (१), मयूर नगर (३), सुरेवाडी (१), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (२), भाग्य नगर (५), एन अकरा, सिडको (२), सारा वैभव, जटवाडा रोड (२), जाधववाडी (४), मिटमिटा (३), गारखेडा परिसर (३), एन सहा, संभाजी पार्क (१), उस्मानपुरा (१), बजाज नगर, वाळूज (३), आंबेडकर नगर, एन सात (१), भारत नगर, एन बारा, हडको (१), उल्का नगरी, गारखेडा (१), नॅशनल कॉलनी (१), नागेश्वरवाडी (२), संभाजी कॉलनी (१), आनंद नगर (१), आयोध्या नगर, सिडको (१), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (३), संत ज्ञानेश्वर नगर (१), राजे संभाजी कॉलनी (४), मुकुंदवाडी (१), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (१), काल्डा कॉर्नर (१), एन सहा, मथुरा नगर (१), नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा (४), एन अकरा (२), टीव्ही सेंटर (४), सुदर्शन नगर (१), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (५), जय भवानी चौक, बजाज नगर (२), महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (१), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (३), फुले नगरी, पंढरपूर (३), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (१), करमाड (३), मांडकी (२), पळशी (४), शिवाजी नगर, गंगापूर (४), भवानी नगर, गंगापूर (१), कटकट गेट (२), जय भवानी नगर (१), लोटाकारंजा (१), यशराज आंगण, हर्सुल सावंगीजवळ (१), एन नऊ, संत ज्ञानेश्वर नगर, हडको (१), मुजीब कॉलनी, रोशन गेट (१), न्यू उस्मानपुरा, क्रांती चौक (१), सिंधी कॉलनी (१), गोरख कॉलनी (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), पालखेड, वैजापूर (१), शिवाजी कॉलनी (१), सिडको (१), पद्मपुरा (२), एन नऊ, शिवाजी नगर, सिडको (१), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (१), दारूसालार मोहल्ला, पैठण (१), जयसिंगपुरा (१), शताब्दी नगर, हडको (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ५४ स्त्री व ७२ पुरुष आहेत. 
 
कोरोना मीटर - 
सुटी झालेले रुग्ण -२०४६ 
उपचार घेणारे रुग्ण - १४०७ 
एकूण मृत्यू -२०३ 
--
एकूण रुग्णसंख्या - ३६५६