Sant Eknath Maharaj : पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या पादुकांसाठी तयार केलेल्या १२० किलो चांदीच्या नवीन रथाचे मिरवणुकीद्वारे स्वागत झाले. हा रथ आषाढी वारीमध्ये पंढरपूरला दिंडीसोबत जाणार असून त्यामध्ये नाथांची पालखी विराजमान होईल.
पैठण : आषाढी एकादशी वारीला जाणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यासाठी बनविण्यात आलेल्या नवीन चांदीच्या रथाची पैठण येथे मंगळवारी (ता. १७) भाविकांनी मिरवणूक काढून स्वागत केले.