
छत्रपती संभाजीनगर : भारतीय लिपींची जननी मनाली जाणारी, भारतातील सर्वांत जुनी लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी. या प्राचीन ब्राह्मी लिपीत श्रीकांत विठ्ठल गोरे याने संपूर्ण भगवद् गीता लिहून काढली. सतत अभ्यास करून त्याने दोन महिन्यांत दोन लिपी शिकून त्या दोन्ही लिपींमध्ये भगवद् गीता लिहून काढण्याचा वेगळाच उपक्रम केला.