Drowning Incident: लासूर येथे पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू
Chh. Sambhajinagar: गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील धरणात तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा पोहण्यासाठी गेलेल्या वेळी बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दल, पोलिस व स्थानिक लोकांच्या प्रयत्नांनी मृतदेह शोधण्यात आला.
लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील देवगाव रोडवरील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ऐन पोळा सणादिवशीच शुक्रवारी (ता. २२) दुपारी घडली.