
छत्रपती संभाजीनगर : पॉलिटेक्निकच्या केंद्रीय प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या. मराठवाड्यातील ६८ पॉलिटेक्निक महाविद्यालयांत चार फेऱ्यांअखेर १५ हजार ४६० प्रवेश निश्चित झाले असून, रिक्त ४.८७५ जागांसाठी संस्थास्तरावरील प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील संस्था स्तरावरील प्रवेश १२ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची असून, बहुतांश महाविद्यालयातील शिकवण्या सुरू झाल्या आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. किरण लाढाणे यांनी सांगितले.