
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या ५३ शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली. महापालिका अधिकाऱ्यांकडे प्रत्येक शाळेची जबाबदारी देण्यात आली होती. पहिल्या दिवशी १,६०० प्रवेश झाले.