संभाजीनगरात दररोज २०० टन ‘बासमती’ होतो फस्त!

संभाजीनगरात बासमती खाण्याऱ्यांची संख्या एवढी आहे, की रोज १५० ते २०० टन बासमती फस्त केला जातो!
Basmati Rice
Basmati RiceSakal
Updated on

परवेज खान

प्रत्येकाच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आवडती वस्तू जर आपल्या ताटात नसली तर घास घशाखाली उतरत नाही. अशीच एक जिन्नस म्हणजे बासमती तांदूळ. विशिष्ट चवीमुळे अनेकांना तांदळाचा हा प्रकार खूपच आवडतो. जिल्ह्यात बासमती खाण्याऱ्यांची संख्या एवढी आहे, की रोज १५० ते २०० टन बासमती फस्त केला जातो! नवीन तांदूळ १५ डिसेंबरनंतर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून यायला सुरुवात होतो. उन्हाळ्यातच धान्याची साठवणूक करण्याची लगबग सुरु असते.

बासमतीचे दर जास्त असले तरी खाणारे भरपूर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बासमतीला मागणी असते.देशातील शेतीच्या एकूण उत्पादनापैकी तांदळाचा सुमारे ४३ टक्के वाटा आहे. गव्हाचे उत्पादन सुमारे ३० टक्के आहे. अशा परिस्थितीत भात हे भारताचे मुख्य पीक समजले जाते. इस्रायल-पॅलेस्टाईन युध्दात भारताने पॅलेस्टाईनला समर्थन दिल्यामुळे इराणने आपल्या देशातील माल घेणे बंद केले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून तांदळाचे दर स्थिर आहेत. जर बंदी उठली तर तांदळाच्या दरात ८ ते १० रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तांदळांमध्ये बासमतीच बॉस

बासमतीचे जवळपास ८० प्रकार आहेत. ४० ते ११८ रुपये किलोपर्यंत त्याचे दर आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा येथून मोठ्या प्रमाणात तांदूळ येतो. बासमती २१७, पंजाब बासमती १ (डॉर्फ बासमती), बासमती ३८६, पंजाब बासमती २, पंजाब बासमती ३, बासमती ३७०, हरियाणा बासमती १, तरवडी बासमती (HBC १९), प्रकार ३ (डेहराडून बासमती), पंत बासमती १६५ (१६) , पंत बासमती २ (IET २१९५३), कस्तुरी, माही सुगंधा, बासमती सीएसआर ३० बासमती-३७०, बासमती-३८५ आणि बासमती-रणबीरसिंहपुरा इतर संकरीत वाणांमध्ये पुसा बासमती यासह ८० प्रकारचे तांदूळ आहेत.

Basmati Rice
स्वच्छ हवा उपक्रमात महापालिकेची ‘हवा’,राज्यात दुसरा तर देशात पटकावले १२ वे स्थान

कोणता तांदूळ कुठे चालतो?

हॉटेल व्यावसायिक बिर्याणी, मसाला, जिरा यासाठी ५० ते ८२ रुपये किलोपर्यंतच्या तांदळाचा वापर करतात. ढाब्यांवर ५० ते ६०, चायनिज गाड्यांवर ४० ते ४५ रूपये किलो दराचे तांदूळ वापरले जातात. जिल्ह्यात बासमती वगळता इतर जातींचा १५० ते २५० टन तांदूळ फस्त केला जातो.

सध्या बासमतीचे दर स्थिर आहेत. इराणने बंदी उठवल्यानंतर आठ ते दहा रुपये वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असून दररोज २०० टन बासमतीची विक्री होते. तर इतर तांदळांची २५० ते ३०० टन दररोज जिल्ह्यात विक्री होते.

— निलेश सोमाणी, होलसेल धान्य विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.