
वैजापूर : गत दहा महिन्यांत वैजापूर विधानसभा मतदारसंघात २ हजार ७८ मतदारांच्या नावांचा समावेश प्रशासनाने नाकारला आहे. यात ९२१ जणांनी नव मतदार तर ८८१ जणांनी स्थलांतरित व दुरुस्तीसाठी अर्ज भरले होते. मात्र, छाननीत हे अर्ज नामंजूर करून त्यांचा समावेश यादीत झालेला नाही. शिवाय २७६ जणांनी यादीतून नाव वगळणीचा अर्ज भरला होता.