
सातारा परिसर : २१५ जवानांनी नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत स्वतःला खाकीसाठी समर्पित केले. पोराला खाकीत पाहून कष्टाचे चीज झाले, असे म्हणत माय-बाप, बहिणींना अश्रू अनावर झाले. सातारा परिसरात दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी (ता.२) राज्य राखीव पोलिस बल भारत बटालियनच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला.