
छत्रपती संभाजीनगर : कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि विक्री व्यवस्थापकांनी संगनमत करून मालाची बनावट बिलिंग तयार केली. याद्वारे युनिचार्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या डायपर उत्पादनाच्या कंपनीने स्थानिक सुपर स्टॉकिस्टचा तब्बल २२ लाख दोन हजार ९९९ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.