Sambhaji Nagar : विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षण विभागाकडून सुटता सुटेनात

मुलींची कुचंबणा : १७२ स्वच्छतागृहे वापरण्यास अयोग्य,जिल्ह्यातील २५० शाळांमध्ये नाही सुविधा
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पाणंदमुक्ती अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी गावस्तरावर वैयक्तिक स्वच्छतागृह व सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकामाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी राज्यात ३० ऑक्टोबरपासून विशेष स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या यू-डायस प्लस २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २५५ शाळांना स्वच्छतागृहे नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, महापालिका, नगरपरिषद, समाज कल्याण, जिल्हा परिषदेच्या सुमारे ४ हजार ४९० शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या अनेक शाळांमध्ये आरटीईप्रमाणे भौतिक सुविधांचा लाभ मिळत नसल्याचे या अहवालातून उघडकीस आले आहे. स्वच्छतागृहाबरोबर वर्गखोल्या, शाळा इमारत, मुख्याध्यापकासाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याचे पाणी, संरक्षक भिंत, क्रीडांगण, स्वतंत्र शौचालय अशा अनेक सुविधा नसल्याचेही ‘यू-डायस प्लस’ची आकडेवारी सांगत आहे.

दोन हजार शाळांना संरक्षणच नाही

शाळेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली संरक्षण भिंत १,८९५ शाळांना नाही; तर १,९९९ शाळांची संरक्षण भिंतीचे काम अर्धवट आहे. ६५० शाळांच्या मोठ्या दुरुस्ती प्रलंबित आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : चालकांच्या संपाचा शाळांनाही फटका

५२ टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही

जिल्ह्यातील एकूण ४,४९० शाळांपैकी २७७८ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत. केवळ १,७१२ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत.

खालील प्रश्न अनुत्तरित

  • शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार १५४ शाळेत मुलांचे; तर १०६ शाळेत मुलींचे शौचालय नाही. ही बाब खेडोपाडी शिक्षण पोचविणाऱ्या व्यवस्थेसाठी अशोभनीय आहे.

  • दरवर्षी सर्व शिक्षा अभियान, डीपीसी, सीएसआर आदींच्या माध्यमातून शाळेसाठी निधी उपलब्ध होतो. पण या निधीचा उपयोग मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी का होत नाही?

  • आरटीईच्या कायद्यामध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची तरतूद आहे. अशातही जिल्ह्यातील २५५ शाळेत शौचालय नाही ही बाब खटकणारी आहे.

  • शौचालय नसल्याने मुलींची कुचंबणा होत आहे. ही त्या शाळेतील शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व प्रशासनासाठी शरमेची बाब आहे. अनेक स्वच्छतागृहांची दुरवस्था

  • जिल्ह्यातील एकूण ४,४९० शाळांतील १७२ शौचालय वापरण्यास योग्य नसल्याची माहिती आहे. त्यात काही शौचालय मोडकळीस; तर कुठे घाण पसरली असल्याने त्याचा वापर होत नाही. यामध्ये १३५ शौचालय मुलांचे असून, ३७ शौचालय मुलींचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com