
छत्रपती संभाजीनगर : औषधनिर्माणशास्त्र पदवी बी.फार्मसीच्या तीन नियमित फेऱ्यांसह संस्था स्तरावरील प्रवेशप्रक्रियेची कट ऑफ डेट संपली आहे. राज्यात बी.फार्मसीचे ३४ हजार १० प्रवेश निश्चित झाले. तब्बल १२ हजार ५०२ (२६.८७ टक्के) जागा रिक्त राहिल्या असून, बी.फार्मसीचे नियमित वर्ग सुरू झाले आहेत.