
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेनंतर मुंबईतही सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भयंकर अशी घटना घडलीय. ३६ वर्षांच्या महिलेकडं १९ वर्षांच्या तरुणाने शरीरसुखाची मागणी केली. महिलेनं नकार देताच तिच्यावर धारदार शस्त्रानं वार केलेत. महिलेवर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या जखमांना तब्बल २८० टाके घालावे लागले आहेत. एक घाव तर सव्वा दोन फूटांचा आहे. मानेपासून मांडीपर्यंत हा वार असून महिलेवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या प्रकरणी १९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आलीय. आरोपी महिलेच्याच भावकीतला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.