Chh. Samhiaji Nagar News : तडजोडीत ३८ प्रकरणे निकाली; महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठाची लोकअदालत
Maharashtra Law : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठाच्या लोकअदालतीत १७५ प्रकरणांपैकी ३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढली गेली. यावेळी विविध शासकीय अधिकारी आणि पॅनल सदस्य उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), खंडपीठ येथे शनिवारी (ता. २१) लोकअदालत पार पडली. यात दाखल एकूण १७५ प्रकरणांपैकी ३८ प्रकरणे तडजोड होऊन निकाली काढण्यात आली.