Sambhaji Nagar : खंडणीखोर भावांनी पुन्हा मागितले २० लाख रुपये

प्रलंबित खटला मागे घेण्यासाठी व्यावसायिकाकडून आधी उकळले चार लाख
sambhaji
sambhajisakal

छत्रपती संभाजीनगर : न्यायालयात प्रलंबित खटला मागे घेण्यासाठी व्यावसायिकाकडून शेजारी राहणाऱ्या दोघा भावांनी चार लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर पुन्हा २० लाख रुपयांची खंडणी मागणी करीत, अल्पवयीन मुलीला पोक्सोअंतर्गत तक्रार देण्यास लावीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल कण्यात आला. अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (२६) आणि त्याचा भाऊ अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार (रा. दोघेही घर क्र. १-१४-५०, जामा मशिदीजवळ, बुढीलाईन) अशी त्या खंडणीखोर भावंडांची नावे आहेत.

याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख महेमूद अहमद जमील अहमद (४७, रा. १-१४-५०, बुढीलाईन) हे फिर्यादी आहेत. फिर्यादीचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी शेख महेमूदसह त्यांचा वाहनचालक अक्रम खान शेर खान पठाण या दोघांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात दोन वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला असून सदर खटला न्यायालयात प्रलंबित आहे. हा खटला मागे घेतो म्हणत आरोपींनी फिर्यादी शेख यांच्याकडून चार लाखांची खंडणी उकळली. मात्र, खटला मागे घेतला नाही. इतकेच नव्हे, तर त्यानंतर सहा डिसेंबरला आरोपी अब्दुल जब्बार याने फिर्यादीविरोधात ठार मारण्याची धमकी, शिवीगाळ केल्याची खोटी फिर्याद दिल्याचे नमूद आहे.

sambhaji
Sambhaji Nagar News : सावधान, कोरोना पुन्हा परतला!

२० लाख दे नाही तर...

१४ डिसेंबर रोजी आरोपी जब्बार हा फिर्यादीविरोधात अल्पवयीन मुलीला पोक्सोंतर्गत फिर्याद द्यायला लावणार असल्याचे जब्बारने फिर्यादीच्या वकीलाला सांगितल्याची माहिती फिर्यादीच्या मित्राने त्यांना दिली. त्यानंतर फिर्यादी, त्याचे मित्र, वकील असे बेगमपुरा ठाण्यात गेले. त्यानंतर आरोपींना समजावून सांगण्यात आले होते.

मात्र, १५ डिसेंबरला दुपारी फिर्यादीला चालकाच्या मोबाईलवर फोन करुन आरोपींनी सत्र न्यायालयात बोलावले, तिथे २० लाख रुपये दिले तरच खटला मागे घेतो, अन्यथा एका अल्पवयीन मुलीला पुढे करुन तुझ्याविरोधात खोटा पोक्सोचा गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर दोन-चार लाख रुपये गेले तरी चालतील पण आणखीन एक दोन केस कराव्या लागतील, असे म्हणत धमकी दिल्याने फिर्यादी घाबरले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

sambhaji
Sambhaji Nagar : लोकसंख्येच्या चौपट झाडे लावा

फिर्यादीच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर फिर्यादीने वेदांतनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने सख्ख्या भावाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच दोघे आरोपी भाऊ फरार झाल्याचे सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com