Pharmacy vacant seats : मराठवाड्यात ‘बी फार्मसी’च्या ४६, तर ‘डी फार्मसी’च्या ३९ टक्के जागा रिक्त
Education News : मराठवाड्यात 'बी फार्मसी'च्या ४६ टक्के आणि 'डी फार्मसी'च्या ३९ टक्के जागा रिक्त आहेत. सोमवारी फार्मसी प्रवेशाची कट ऑफ डेट असून, संस्थांनी २३ डिसेंबरपर्यंत डेटा अपलोड करायचा आहे.
छत्रपती संभाजीनगर : यंदा आतापर्यंत ‘बी फार्मसी’ आणि ‘डी.फार्मसी’च्या तीन प्रवेशफेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मराठवाड्यात १०२ संस्थांमध्ये तिसऱ्या फेरी अखेर ‘बी फार्मसी’चे ५४ टक्के प्रवेशच निश्चित झाले.