Sillod News : आठवडाभरात ५० जणांना कुत्र्यांनी घेतला चावा

सिल्लोड शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये एकाच दिवशी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये वीस पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले.
50 people were bitten by street dogs in sillod
50 people were bitten by street dogs in sillodSakal

सिल्लोड : सिल्लोड शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये एकाच दिवशी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये वीस पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

यातील अनेक जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आठवडाभरात ५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

मंगळवारी (ता. ७) सकाळच्या सुमारास शहरातील मोंढा रोड तसेच मुख्य रस्ता व सराफा मार्केट परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालत सात नाकरिकांना चावा घेऊन जखमी केले. तर तालुक्यातील जंजाळा, मंगरूळ, उंडणगाव, डिग्रस मोढा,

पळशी, हट्टी व लगतच्या भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील सहा लोकांना कुत्र्यांनी चावा घेत जखमी केले. मागील तीन दिवसांपासून विविध ठिकाणी २४ नागरिक कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. तर आठवडाभरात ५० लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठा उच्छाद बघावयास मिळत आहे.

रविवारी यांना घेतला चावा

रविवारी जयश्री दीपक गायकवाड (वय २८, रा.अन्वी), रूद्र जरारे (वय ८, रा.हट्टी), अविनाश दांडगे (रा. सारोळा) व शहरातील सविता सपकाळ (वय ३५) हे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले.

सोमवारी यांना घेतला चावा

सोमवारी प्रतापसिंग सुखलाल चुगडे (वय ६५), गजराज प्रतापसिंग चुगडे (वय ४०, दोघे रा.आव्हाना, ता.भोकरदन), गणेश काशीनाथ राजपूत (वय २५, रा. पळशी) हे जखमी झाले आहेत.

मंगळवारी यांना घेतला चावा

मंगळवारी शहरातील राधिका कासलीवाल (वय ७०), रमेश कासलीवाल (वय ६७), शेख गफ्फार शेख जब्बार (वय ४७) हे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. तर ग्रामीण भागात अकिल शकील खान (वय २०, रा.जंजाळा),

युवराज बगळे (वय ५०, रा.मोढा), तन्मय विनोद मनगटे (वय ३, रा.लोहगाव), योगेश बाजीराव काकडे (वय २७, रा.मंगरूळ), संतोष प्रकाश अक्कर (वय २८, रा. उंडणगाव), शाहिदाबी शेख मुख्तार (वय ५०, रा. डिग्रस, अमोल त्रिंबक पांडे (वय २९, रा. मंगरूळ) हे जखमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com