शेतकऱ्यांच्या ५ हजार अग्रिमसाठी पडताळणीचे १६ टक्के काम पूर्ण

शेतकऱ्यांच्या ५ हजार अग्रिमसाठी पडताळणीचे १६ टक्के काम पूर्ण
Published on: 
पाच हजार अग्रीमसाठी पडताळणीचे १६ टक्के काम पूर्ण जालना, ता. ३० : दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रति शेतकरी पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावाचे पोर्टलवरील पडताळणीचे काम गुरुवारी (ता. २९) १६ टक्के झाले आहे. दरम्यान, पदवीधर निवडणुकीच्या कामात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी अडकल्याने पडताळणीच्या कामाला विलंब झाला. आता मात्र काम वेगाने सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रतिशेतकरी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता ७,५०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे शासकीय यंत्रणेने पूर्ण केले आहे. दरम्यान, आता ६ लाख ८४ हजार ७१७ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम रक्कम जमा करण्यासाठी शासनाकडून दिलेल्या पोर्टलवर लाभार्थींच्या माहितीची पडताळणी करण्याचे आणि मंजुरी देण्याचे काम तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना करावयाचे आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. २९) दुपारपर्यंत जिल्ह्यातील ९५० पैकी १४४ गावातील लाभार्थींची पडताळणी पूर्ण झाली असून परतूर तालुक्यातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. लवकरात लवकर ही पडताळणी पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.