Sambhaji Nagar News : लायन्स क्लबच्या शिबिरात ५२ शस्त्रक्रिया

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद-चिकलठाणा यांच्या वतीने आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर तसेच औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे ४७ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर घेतले जात आहे.
sambhajio nagar
sambhajio nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणाच्या वतीने मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर घेतले जात आहे. यात पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता. १४) छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धुळे आणि जालना येथून आलेल्या विविध विकृती असलेल्या ५२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद-चिकलठाणा यांच्या वतीने आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर तसेच औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे ४७ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर घेतले जात आहे.

sambhajio nagar
Sambhaji Nagar : मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे

एमजीएममध्ये डॉ. राज लाला आणि डॉ. ललिता, डॉ. अमित बसन्नवार, डॉ. उज्ज्वला दहिफळे यांच्यासह एमजीएमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया केल्या. शिबिरात एकूण ३५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यातील ५२ शस्त्रक्रिया गुरुवारी झाल्या. यात दुभंगलेले ओठ, नाकावरील विकृती, पडलेली पापणी, व्रण आणि चट्टे या शस्त्रक्रियांचा सामावेश होता.

शिबिरात एमजीएम हॉस्पिटलचे भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ यांच्यासह मदतनीस आदींनी सहकार्य केले. पुढील तीन दिवसांत एमजीएम हॉस्पिटलमध्ये उर्वरित रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com