
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने तीन दिवसांपासून मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. पाच) महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने एमआयटी कॉलेज ते महानुभाव आश्रम चौकापर्यंतच्या सर्व्हिस रोडला अडथळा ठरणाऱ्या ६४ बांधकामांवर हातोडा मारला.