
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला वेग आला असून, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथील मालमत्तेचे मूल्यांकन सुरू आहे. तसेच विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी १५० कोटी २५ लाखांचा निधी उपविभागीय प्रशासनाला प्राप्त झाला असून, भूसंपादनासाठी जवळपास ७०० कोटींपेक्षा अधिक निधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.