
बीड : पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना मृगबहार सण २०२४ मध्ये विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील ३ हजार ४२३ अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान आतापर्यंत ७२५ ठिकाणी फळबागा नसणे, अधिकचे क्षेत्र दाखवणे, झाडे लहान असणे अशी प्रकरणे समोर आली आहेत. ही सर्व बोगस प्रकरणे विमा कंपनीने रद्द करावी अशी सूचना जिल्हास्तरीय समितीने संबंधित विमा कंपन्यांना केली आहे.