Success Story: ज्ञानाच्या ध्यासातून चक्क ७९ व्या वर्षी पीएचडी! डॉ. निर्मला बहिरव सोनवणे यांचा अनोखा प्रवास, सात पदव्याही गाठीशी
Inspiring story: ७९ वर्षीय डॉ. निर्मला बहिरव-सोनवणे यांनी तब्बल २५ वर्षांच्या खंडानंतर एमफिल, नेट उत्तीर्ण करत अखेर पीएचडी मिळविली. मुलांचे संगोपन व संसार सांभाळत सात पदव्या मिळवत शिक्षणाची भूक कायम ठेवली.
छत्रपती संभाजीनगर : शिकण्याचे कोणतेही वय नसते, हे ज्ञानाच्या वाटेवरील साधक असलेल्या ७९ वर्षीय डॉ. निर्मला बहिरव-सोनवणे यांनी दाखवून दिले आहे. तब्बल २५ वर्षांच्या गॅपनंतर एमफिल, नेट उत्तीर्ण होत आता त्यांनी पीएचडी मिळविली.