Cattle Rescue : डांबलेल्या ८६ गोवंशांची सुटका; किलेअर्क, जलाल कॉलनी परिसरात चार ठिकाणांवर छापे
Cow Protection : छत्रपती संभाजीनगरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सिटी चौक पोलिसांनी ८६ गोवंशांची सुटका केली. चार ठिकाणी छापे टाकून २० लाखांचे गोवंश जप्त; तीन आरोपी ताब्यात.
छत्रपती संभाजीनगर : अवैधरीत्या कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ८६ गोवंशांची सिटी चौक पोलिसांनी छापा मारत सुटका केली. चार जूनला सायंकाळी किले अर्क आणि जलाल कॉलनी भागात चार ठिकाणी छापे मारत ही कारवाई करण्यात आली.