Chhatrapati Sambhajinagar Crime : परप्रांतीय व्यापाऱ्याकडून ९९ लाखांची फसवणूक

सिडकोत गुन्हा : कापसाच्या मालाचे बिल बुडवून कोर्टाची दिशाभूल
99 lakh fraud from foreign trader cotton bill fabricate evidence court crime
99 lakh fraud from foreign trader cotton bill fabricate evidence court crimeesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिनींग व कापसाचा व्यापार करणाऱ्या उद्योजकाकडून कापसाचा माल खरेदी करत कोलकत्याच्या भामट्याने ९९ लाख ६५ हजारांची फसवणूक केली. जुलै २०१८ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.

या प्रकरणी कोलकता येथील संशयित अरिहंत सेल्स कॉर्पोरेशनचे मनोज प्रकाशचंद जैन याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी शाम त्रिलोकचंद अग्रवाल (४४, रा. टाऊन सेंटर एन-१ सिडको) यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे, की अग्रवाल यांची एमआयडीसी चिकलठाणा भागात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथे सिद्धी फायबर्स ही फर्म आहे.

काही महिन्यांपूर्वी मनोज जैन याने उधारीवर कापसाचा धागा पुरवण्यासाठी संपर्क केला होता. पुरवठा केलेल्या मालाचा मोबदला १५ दिवसांत न भेटल्यास १५ टक्के व्याजाने रक्कम आकारण्याचे देखील ठरले होते.

या व्यवहारानुसार अग्रवाल यांनी जैनला अनेक वेळा माल पाठवला. मात्र, जैन याने त्याच्या दोन बिलाच्या ५५ लाख २७ हजारांचा माल ठेवून घेत त्याची मुळ रक्कम तसेच त्या रकमेवरील व्याज ४४ लाख ३७ हजार असे एकूण ९९ लाख ६५ हजार रुपये न देता फसवणूक केली.

पैसे मिळविण्याकरिता अग्रवाल यांनी न्यायालयात धाव घेतली असता जैन याने कोर्टात खोटे व बनावट शपथपत्र दाखल करून तसेच जीएसटीचा परतावा देखील घेतला असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com