सकाळ संवाद (लोगो वापरा) (((((सर्व फोटो ओव्हरसेट))))
----------------------
फोटो ः (ABD26J82013)
संकर्षण कऱ्हाडे.
----------------------------------------------------------
तुम्ही तेच मांडू शकता, जे तुमच्यात झिरपलंय!
-
संकर्षण कऱ्हाडेंसह टीमने केली नात्यांमधील जिव्हाळा, अनुभवावर चर्चा
-
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. २५ ः ‘तुम्ही तेच मांडू शकता, जे तुमच्यामध्ये झिरपले आहे. कलाकृती ही समाजाचा आरसा असते. आपण जे अनुभवतो, परिसरात जे पाहतो, त्यातूनच विचारांना आणि कथांना आकार मिळतो’, असे लेखक, अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी सांगितले. १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘आदि अनंत’ या चित्रपटानिमित्त त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. आजोबा-नातवाच्या नात्यातून उलगडणाऱ्या या चित्रपटाची कथा, त्यामागील वैयक्तिक आठवणी, चित्रपट निर्मितीचा प्रवास आणि मराठी चित्रपटांसमोरील आव्हाने यावर यावेळी मनमोकळी चर्चा झाली.
संकर्षण यांच्या बालपणीच्या आठवणी, परभणीतील घर, कुटुंब आणि आजोबांसोबतचे भावनिक नाते यांतून ‘आदि अनंत’ची कथा आकाराला आली. आजोबांची सेवा करताना अनुभवलेला प्रसंग आजही त्यांच्या मनात आहेत. ‘तू माझ्यासाठी जे करतो आहेस, ते कधी वाया जाणार नाही’, हे आजोबांचे शब्द त्यांच्या मनावर कोरले गेले. स्वतःचे अनुभव प्रामाणिकपणे मांडले, तर ते अनेकांच्या आयुष्याशी जोडले जातात, असा त्यांचा विश्वास आहे. चित्रपटात विनोद आणि भावनिक प्रसंगांमधून नात्यांचे महत्त्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवासही सोपा नव्हता. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर योग्य सहकारी मिळाल्याने चित्रपट पूर्ण झाला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा कामातील उत्साह आणि त्यांचे मार्गदर्शन संकर्षण यांच्यासाठी मोलाचे ठरले’, असेही संकर्षण यांनी यावेळी सांगितले. अभिनेता योगेश शिरसाठ, सखी गोखले, वैदेही परशुरामी आणि कविता लाड या कलावंतांचा चित्रपटात समावेश आहे.
-------------------
(ABD26J82014)
-------------------
धावताना नात्यांना वेळ द्या
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांनीही नात्यांमधील जिव्हाळ्याचे महत्त्व सांगितले. ‘आपण सगळे फक्त धावत आहोत. यामुळे माणुसकी आणि माणसं मागे पडत आहेत. त्यामुळे आपल्या माणसांना वेळ द्या’, असे ते म्हणाले. ‘चित्रपटातील आजोबा-नातवाचे नाते पाहताना प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्यातील क्षण आठवतील. चित्रपट निर्मिती ही सतत शिकण्याची प्रक्रिया असून, प्रत्येक वेळी नवे काही शिकायला मिळते’, असेही त्यांनी नमूद केले.
---
(ABD26J82012 योगेश शिरसाठ)
सहज विनोदातून फुलते नात्यांची गोष्ट
अभिनेता योगेश शिरसाठ यांनी संकर्षण यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या. सुरवातीला ते संकर्षण यांचे मेकअप करायचे. पुढे अभिनयाकडे वळल्यानंतर ‘आदि अनंत’मध्ये त्यांना संकर्षण यांच्या मित्राची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. चित्रपटातील विनोद मुद्दाम आणलेला नसून, तो प्रसंगांतून सहज उलगडतो. आजोबा-नातवाच्या नात्याशी तो सुंदररीत्या गुंफला आहे. त्यामुळे हा चित्रपट कुटुंबासह पाहण्यासारखा असल्याचे त्यांनी सांगितले.
--
(ABD26J82041)
चांगल्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोचविणे गरजेचे
निर्माता समीर हम्पी म्हणाले, ‘मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. मात्र, चांगल्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे’’, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय अनुभव सांगताना त्यांनी प्रेक्षकांची आवड आणि प्रतिसाद अधोरेखित केला.
--