esakal | खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून ‘आप’चे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचा निषेध म्हणून आम आदमी पक्षातर्फे खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावत आंदोलन करण्यात आले.

खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून‘आप’चे आंदोलन

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचा निषेध म्हणून आम आदमी पक्षातर्फे (Aam Adami Party) खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावत आंदोलन करण्यात आले. तातडीने रस्त्यांचे कामे पूर्ण करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सातारा देवळाई परिसर महापालिकेत (Aurangabad) सामाविष्ट होऊन सहा ते सात वर्ष झाले आहेत. तरीही या भागाचे प्रश्न सुटू शकले नाहीत. या भागात रस्ते नाहीत, ड्रेनेजलाईन नाही, पिण्याचे पाणीही नाही. शहाराच्या रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीअंतर्गत शंभर कोटी रुपये मिळाल्यानंतरही या भागातील रस्त्याचे कामे करण्यात आले नाही. छत्रपतीनगर मध्ये क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अलोकनगर जवळील रस्ता अर्धवट सोडण्यात आला आहे. आयप्पा मंदिर ते अलोकनगर रस्ता कुठे गायब झाला समजू शकत नाही. शिवाजीनगर रेल्वेगेट ते देवळाई चौकाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.(aap agitation against potholes in aurangabad glp88)

हेही वाचा: विक्की ठाकूर खून प्रकरण: नांदेडला आठ अट्टल गुन्हेगार जेरबंद

रेल्वेगेटजवळच्या रस्त्यात मोठे-मोठे खड्डे पडलेले असल्याने दिवसभर वाहतूकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळ अर्धवट रस्त्यांचे कामे पुर्ण करावेत, अर्धवट रस्ते सोडणाऱ्या संबंधीतांची चौकशी करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात शहराध्यक्ष वैजनाथ राठोड, सचिव दत्तु पवार, प्रकाश विश्वकर्मा, सतीष संचेती, रेखा महाजन, पाशा खान, अभय वडमारे, कैलास बससोडे, सय्यद अजहर आदींनी सहभाग घेतला.

loading image
go to top