esakal | विक्की ठाकूर खून प्रकरण: नांदेडला आठ अट्टल गुन्हेगार जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगार ताब्यात

विक्की ठाकूर खून प्रकरण: नांदेडला आठ अट्टल गुन्हेगार जेरबंद

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : जुन्या नांदेडमधील (Crime In Nanded) गाडीपुरा भागात गोळीबार करून विक्की ठाकूरचा खून (Vikki Thakur Killing Case) करून फरारी झालेल्या आठ अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे (IPS Pramodkumar Shewale) यांनी बुधवारी (ता.२८) दुपारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात महिती दिली. अवघ्या आठवडाभरात पोलिस पथकाने (Nanded) ही कारवाई केली आहे. गाडीपुरा भागात २० जुलैला सायंकाळी साडेसातच्या सुमारास विक्की दशरथसिंह ठाकूर (वय ३२) याचा गोळीबारानंतर तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सहकाऱ्यांसह तपास सुरू केला होता. मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने आठ संशयितांना जेरबंद केले आहे.(eight criminals arrested for vikki thakur killing in nanded glp88)

हेही वाचा: मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

खुनाच्या गुन्‍ह्यातील पोलिसांनी मंगळवारी नितीन जगदीश बिगानिया (वय ३३, रा. रवीनगर, कौठा), लक्ष्मण ऊर्फ लक्की बालाजी मोरे (२३, रा. सन्मित्रनगर, मुदखेड), दिगंबर ऊर्फ डिग्या टोपाजी काकडे (२७), मयूरेश सुरेश कत्ते (२०), सोमेश सुरेश कत्ते (२२), कृष्णा ऊर्फ गब्या छगनसिंग परदेशी (२०), मुंजाजी ऊर्फ गब्या बालाजी धोंडगे (२०, सर्व रा. रवीनगर, कौठा, नांदेड) आणि तानाजी शंकर चव्हाण (३१, रा. खोब्रागडेनगर, साठे चौक, नांदेड) यांना अटक केली आहे. अटक केलेल्या या आठ संशयितांवर खुनाच्या गुन्ह्यासह इतरही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर काही गुन्ह्यात फरार आरोपी आहेत. त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

अधिकाऱ्यांकडून पथकाचे कौतुक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, नीलेश मोरे यांनी पोलिस निरीक्षक चिखलीकर आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

loading image
go to top