Aaranksha Yadav appointed Ausa SDPO
esakal
औसा : औसा पोलीस उपविभागाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल होणार असून, येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी २०२३ बॅचच्या युवा आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे औसा उपविभागाला युवा महिला आयपीएस अधिकाऱ्याचे नेतृत्व मिळणार आहे.