
छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक क्रेडिट्सचे (गुणांक) डिजिटल स्वरूपात संकलन, संग्रह आणि ट्रॅकिंग करण्यावर नव्या शैक्षणिक धोरणात महत्त्व आले आहे. गुणांक संग्रहासाठी विद्यार्थ्यांना एबीसी-आयडी तयार करून विद्यार्थ्यांचे गुणांक अपलोड करण्याचे काम सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युद्धपातळीवर सुरू आहे.