

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: आमदार अब्दुल सत्तार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील पकड कमी करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भाजपच्या खेळीला यश येत असून बँकेच्या निवडणुकीत अर्जांच्या छाननीत याची पहिली ‘झलक’ दिसून आली.
सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर, शिवसेनेच्या कन्नडच्या आमदार संजना जाधव, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांसह ४५ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले. बाद झालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक उमेदवार हे महायुतीतील शिवसेनेचे, त्यातल्या त्यात सत्तार यांच्या गटातीलच आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत सत्तारांचे पंख छाटण्यासाठी भाजपने ठरवून पहिला वार केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.