क्रिएटिव्ह डिझाइन व मार्केटिंग क्षेत्रात कु. अभिज्ञा प्रसाद रामदासी यांच्या करिअरचा यशस्वी प्रवास.......
कु. अभिज्ञा रामदासी, जगाच्या व्यासपीठावर न्यूयॉर्कमध्ये क्रिएटिव्ह ॲण्ड मार्केटिंग क्षेत्रात सध्या कार्यरत.
अल्पपरिचय : कु. अभिज्ञा प्रसाद रामदासी
शालेय शिक्षण :
१) प्री-प्रायमरी ते वर्ग २ रीपर्यंत टेंडर केअर स्कूल, सातारा, छत्रपती संभाजीनगर.
२) वर्ग ३ री ते १० वीपर्यंत गुरुकुल शाळा, भोसलेनगर, पुणे.
३) वर्ग १० वी ते वर्ग १२ वीपर्यंत संस्कृती शाळा, भूगाव, पुणे.
४) बॅचलर ऑफ डिझाइन पदवीपर्यंतचे शिक्षण एम.आय.टी. आय.डी. युनिव्हर्सिटी, लोणी, पुणे.
५) मास्टर इन फाइन आर्ट पदव्युत्तर शिक्षण सॅव्हाना कॉलेज ऑफ आर्ट ॲण्ड डिझाइन (स्कॅड), जॉर्जिया.
परिवारासंबंधी संक्षिप्त माहिती :
श्री. प्रसाद रामदासी (वडील), औरंगाबादच्या जे.एन.ई.सी. कॉलेजमधून इंजिनिअर. जी.एम., डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन (ए.टी.एस. ग्लोबल, पुणे).
डॉ.सौ. प्रीती प्रसाद रामदासी (आई), कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी. आहेत. टी.सी.एस., पुणे येथे काम करत आहेत.
चि. राघव प्रसाद रामदासी (भाऊ) सी.ओ.ई.पी., पुणे येथे मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.
गावच्या मातीशी नाळ, भारतीय संस्कारांची शिदोरी; डिझाइन विश्वात कु. अभिज्ञा रामदासींची जागतिक भरारी
भारतीय संस्कृतीचे संस्कार, आधुनिक शिक्षण आणि विविध अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन मेथवडेच्या रामदासी परिवारातील कन्या कु. अभिज्ञा रामदासी आज न्यूयॉर्कच्या सर्जनशील विश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.
भारतात वाढताना अनुभवलेले रंग, हस्तकलेची परंपरा, गावाकडचे राहणीमान, सण-उत्सव आणि कथाकथनाची शैली यांचा प्रभाव अभिज्ञाच्या कामावर दिसून येतो. भारतीय संस्कृतीतील हा समृद्ध वारसा ती फॅशन, लक्झरी, लाइफस्टाइल, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि फिल्म या क्षेत्रांतील आधुनिक सर्जनशीलतेशी जोडत आहे.
पुण्यातील एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनमधून डिझाइनचे शिक्षण घेतल्यानंतर तिने फ्रान्समधील नाँत येथेही शिक्षण घेतले. मुंबईतील यंत्र डिझाइन स्टुडिओमध्ये काम करताना नेटफ्लिक्स इंडियाच्या एका वेब सिरीजसाठी प्रॉडक्शन डिझाइनचा अनुभव तिला मिळाला.
पुढे अमेरिकेतील सॅव्हाना कॉलेज ऑफ आर्ट ॲण्ड डिझाइन (स्कॅड)मधून तिने ॲडव्हर्टायझिंगमध्ये मास्टर ऑफ फाइन आर्टस ही पदवी घेतली. आर्ट डायरेक्शन, ब्रँड मॅनेजमेंट आणि सोशल स्ट्रॅटेजी या क्षेत्रांचा सखोल अभ्यास करताना तिने विविध सर्जनशील प्रकल्पांचे नेतृत्व केले. कॉटीसोबतच्या स्कॅडप्रो प्रकल्पात लक्झरी फ्रॅग्रन्स ब्रँडच्या ३६० अंश कॅम्पेनच्या विकासातही तिने महत्त्वाची भूमिका बजावली.
अभिज्ञाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे २०२४ मध्ये न्यूयॉर्कमधील शनेलच्या स्पेशल प्रोजेक्ट्स टीममध्ये इंटर्न म्हणून मिळालेला अनुभव. कोल्हापूरशी नाते असलेल्या लीना नायर यांचे जागतिक लक्झरी क्षेत्रातील नेतृत्व आणि शनेलसारख्या प्रतिष्ठित ब्रँडची कामातील शिस्त, बारकावे आणि उत्कृष्टतेचा ध्यास जवळून अनुभवता आल्याचे ती सांगते.
जागतिक अनुभव घेत असतानाही अभिज्ञाची भारतीय विचारांशी असलेली नाळ कायम घट्ट राहिली आहे. कोकणातील दिलीप कुलकर्णी काका यांच्या निवासी शिबिरातून तिला शाश्वत जीवनशैली आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याच्या विचारांची नवी जोड मिळाली. घरातून मिळालेल्या दासबोधाच्या शिकवणीचाही आपल्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असल्याचे ती आवर्जून सांगते.
आज न्यूयॉर्कमध्ये क्रिएटिव्ह ॲण्ड मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिज्ञाला इंग्रजी, फ्रेंच, हिंदी आणि मराठी भाषा अवगत असून, संस्कृतचीही विशेष आवड आहे. विविध संस्कृतींना समजून घेणे ही केवळ आपली ओळख नसून सर्जनशीलतेची खरी ताकद आहे, असे ती मानते.
पुढील काळात डिझाइन, फिल्म, ब्रँड कॅम्पेन्स आणि अनुभवात्मक कलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील समृद्धी आणि बारकावे जागतिक व्यासपीठावर नव्या रूपात मांडण्याची तिची इच्छा आहे.
“आजचे सर्वांत उत्साहवर्धक सर्जनशील काम वेगवेगळ्या संस्कृती जिथे एकमेकांना भेटतात, त्या संगमावर घडत आहे. मला नेमके तिथेच काम करायचे आहे”, असे अभिज्ञा सांगते.
डिझाइन क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी किंवा या क्षेत्राबद्दल उत्सुकता असणाऱ्यांशी बोलायला तिला खूप आवडते. त्यामुळे अशा व्यक्तींना अभिज्ञाशी संपर्क साधता येईल.
अभिज्ञा रामदासी यांचे संकेतस्थळ : www.abhidnyaramdasi.com
ई-मेल : Abhidnya.r२@gmail.com
Photo Captions :
Ph१ - पदवीदान प्रसंगी कु. अभिज्ञा रामदासी.
Ph२ - ‘जाणता राजा’ या नाटकात कु. अभिज्ञा व त्यांच्या आईची एक छोटी भूमिका.
Ph३ - कु. अभिज्ञा रामदासी यांची हिंदी चित्रपट क्षेत्रातील नामवंत गायक व संगीतकार श्री. शंकर महादेवन यांच्यासोबत झालेली अविस्मरणीय भेट.
Ph४ - कु. अभिज्ञा रामदासी यांचा परिवारासोबतचा निवांत क्षण.
Ph५ - कु. अभिज्ञा रामदासी त्यांच्या परदेशातील मैत्रिणींसोबत.