esakal | औरंगाबाद महापालिकेकडे 'कोव्हिशिल्ड'चा साडेपंधरा हजारांचा साठा
sakal

बोलून बातमी शोधा

covishield

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाप्रतिबंधक लसींचा साठा मुबलक प्रमाणात आहे. कारण सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचेच लसीकरण सुरू आहे.

औरंगाबाद महापालिकेकडे 'कोव्हिशिल्ड'चा साडेपंधरा हजारांचा साठा

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccination) काही दिवसांपूर्वी तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर (Corona Vaccination Sites) रांगा लावून नागरिक त्रस्त होते. पण आता महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशींचा (Covishield) १५ हजार ५६० डोसचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.२७) ६९ केंद्रांवर कोव्हिशिल्ड व एका केंद्रावर कोव्हॅक्सिन (Covaxin) लस दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले. शहरात (Aurangabad) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाप्रतिबंधक लसींचा साठा मुबलक प्रमाणात आहे. कारण सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचेच लसीकरण सुरू आहे. त्यात कोव्हिशिल्डच्या दोन लसीमधील अंतर वाढवून ८४ दिवस करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या लसी लवकर संपत नसल्याचे चित्र आहे. (Above 15 Thousand Covishield Doses Have With Aurangabad Municipal Corporation)

हेही वाचा: तरुण डाॅक्टरची झुंज अयशस्वी, आर्थिक मदत लवकर मिळाली असती तर..

या संदर्भात डॉ.पाडळकर यांनी सांगितली की, महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशींचे १५ हजार ५६० डोस शिल्लक आहेत, तर कोव्हॅक्सिनचे ५१० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे गुरुवारी मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ६९ केंद्रे कोव्हीशिल्ड लसीसाठी तर एक केंद्र कोव्हॅक्सिनसाठी निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेला कोव्हॅक्सिनचे दहा डोस आणि कोव्हीशिल्डचे ४७३० डोस मिळणार आहेत. कोव्हीशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये कमीत कमी ८४ दिवस अंतर असणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी ८४ दिवस पूर्ण झाल्यावर कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस घ्यावा असे महापालिकेने कळविले आहे. लसीकरण केंद्रांवर हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्सला कोव्हीशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस व ४५ आणि त्यावरच्या वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. म्हणून इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.