esakal | तरुण डाॅक्टरची झुंज अयशस्वी, आर्थिक मदत लवकर मिळाली असती तर..
sakal

बोलून बातमी शोधा

डाॅ.राहुल पवार

राहुल हे लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस इंटर्न म्हणून कार्यरत होते. येथे कोविड केंद्रात काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

तरुण डाॅक्टरची झुंज अयशस्वी, आर्थिक मदत लवकर मिळाली असती तर..

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : सगळ्यांना आशा होती लवकरच डाॅ.राहुल पवार बरे होतील. पण ती आशा अपूर्णच राहिली.अखेर डाॅ.राहुल पवार यांची म्युकरमायकोसिसशी (Mucormycosis) झुंज अयशस्वी ठरली. आज बुधवारी (ता.२६) त्यांचे येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून डाॅ.राहुल कोरोनाशी (Corona) झुंज देत होते. त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिस आजार झाला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की डाॅ.राहुल यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाले होते. (Young Doctor Rahul Pawar Died Due To Mucormycosis In Aurangabad)

हेही वाचा: वैद्यकीय शिक्षणमंत्री महोदय, डाॅक्टर कोरोनाशी झुंज देतोय, करणार का मदत?

अत्यंत गरिबीतून डाॅक्टर

राहुल हे लातूर (Latur) येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात (MIMSR Medical College) एमबीबीएस (MBBS) इंटर्न म्हणून कार्यरत होते. येथे कोविड केंद्रात (Covid19) काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. राहुल हे मूळचे राहणारे परभणी (Parbhani) जिल्ह्यातील लिंबा (ता.सोनपेठ) येथील होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करणे त्यांच्या आईवडिलांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी आर्थिक मदत करण्याचे सोशल मीडियावर लोकांना आवाहन केले होते. त्यातून दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम लोकसहभागातून संकलित केले होते. 'ई सकाळ'ने राहुल पवार यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सर्वप्रकारची मदत करण्याचे आदेश आरोग्य विभाग व एमजीएम रुग्णालयाला (MGM Hospital) दिले होते.