University news : ‘बामू’च्या गुणवत्तेची झाडाझडती! ; विद्यापीठातील विभागांचे देशभरातील तज्ज्ञांकडून ‘अकॅडमिक ऑडिट’

देशभरातील १७ प्राध्यापक, तज्ज्ञांनी मंगळवारी (ता. १९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (बामू) सर्वच विभागांना भेटी देत गुणवत्तेची झाडाझडती घेतली. अतिशय गुप्तपणे राबविण्यात आलेल्या १७ जणांचा सहभाग असलेल्या चार पथकांनी विद्यापीठातील सर्वच विभागांचे ‘अकॅडमिक ऑडिट’ केले.
University news
University news sakal

छत्रपती संभाजीनगर : देशभरातील १७ प्राध्यापक, तज्ज्ञांनी मंगळवारी (ता. १९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (बामू) सर्वच विभागांना भेटी देत गुणवत्तेची झाडाझडती घेतली. अतिशय गुप्तपणे राबविण्यात आलेल्या १७ जणांचा सहभाग असलेल्या चार पथकांनी विद्यापीठातील सर्वच विभागांचे ‘अकॅडमिक ऑडिट’ केले. यामध्ये प्रामुख्याने ‘नॅक’च्या पॅरॉमीटरनुसार सर्व काही ‘आलबेल’ आहे का? यासह विद्यार्थीकेंद्रित गुणवत्तेवर आधारित शिक्षण आहे का? संशोधन, पेटंट, डिजिटल क्लासरूम, ई-कंटेंट यासंदर्भातील, स्टुडंट रिसर्च रेशो आदींची झाडाझडती घेतली.

महत्त्वाचे म्हणजे ‘अकॅडमिक ऑडिट’दरम्यान संबंधित तज्ज्ञांना जवळपास सर्वच विभागांतील रिक्त असलेली ५० टक्के प्राध्यापकांची संख्या समोर आली, ही बाब गांभीर्याने नोंदवत त्यासंदर्भातील अहवाल तज्ज्ञांच्या चमूने दिल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. ‘अकॅडमिक ऑडिट’साठी चार ग्रुप करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी प्रत्येकी दोघांचा समावेश असलेल्या चार ग्रुपने आणि प्रत्येकी चार जणांचा समावेश असलेल्या दोन ग्रुपने उर्वरित आंतरविद्याशाखा आणि वाणिज्य, व्यवस्थापन विभागांचे चार तासांत ४० विभागांचे ऑडिट केले. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २०) धाराशिव उपकेंद्रातील विज्ञान तंत्रज्ञान शाखा, ह्यूमॅनिटीज, आंतरविद्याशाखा, वाणिज्य, व्यवस्थापन विभागांचे ऑडिट चार ग्रुपमधील १२ जण करणार आहेत.

रिक्त संख्या अन् संशोधनावर...

१७ जणांच्या चमूने ‘अकॅडमिक ऑडिट’मध्ये तब्बल ५५ मुद्द्यांवर मूल्यांकन केले. यामध्ये प्रामुख्याने बामू विद्यापीठातील जवळपास प्रत्येक विभागात असणारी ५० टक्के प्राध्यापकांची रिक्त संख्या; तसेच संशोधन, टीचिंग करिकुलम, गुणवत्तेवर आधारित संशोधन, ई-कंटेंट, डिजिटल क्लासरूम यासंदर्भात ‘नॅक’च्या नियमावलीनुसार आढळून आले नसल्याचे पथकातील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे या चमूकडून लवकरच यासंदर्भातील अहवाल कुलगुरूंना सादर केला जाणार आहे. अहवालातील विद्यापीठाच्या दुखऱ्या बाबींवर कितपत काम होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

University news
Sambhaji Nagar News : विकास आराखड्यामध्ये कागदपत्रांचा ‘झोल’

तीन वर्षांचे असेल ‘ऑडिट’

याआधीच शेवटचे अकॅडमिक ऑडिट हे २०१८-१९ दरम्यान झाले होते. त्यानंतर २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांचे हे ऑडिट करण्यात येत असून, त्यानुसार कुलगुरूंना हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. या चमूत प्रामुख्याने गुलबर्गा विद्यापीठ, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बंगळुरू विद्यापीठातील तज्ज्ञ, प्राध्यापकांचा यात समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com