esakal | औरंगाबादेत उभ्या ट्रकवर कंटेनर आदळल्याने चालक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

औरंगाबादेत उभ्या ट्रकवर कंटेनर आदळल्याने चालक ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: उभ्या ट्रकवर बीडच्या दिशेने कुरिअर घेऊन जाणारा कंटेनर आदळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात गुरुवारी (ता. २२) मृत्यू झाला. हा अपघात झाल्टा फाटा येथे घडला. फिरोज बुन्दू खान (रा. चिरचिटा बुलंदशहर, मुकीमपुरा, उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.

उत्तर प्रदेशातील सरताज मोहंमद आझाद मोहंमद (२४, रा. पखरोला, हाशमपुर) हा त्याचे भावजी फिरोज खान असे दोघे पुण्यातील दादाभाऊ आनंदा झांझड यांच्या कंटेनरवर (एमएच-१४-एचजी-७१९९) चालक आहेत. २१ जुलै रोजीरात्री अकराच्या सुमारास फिरोज खान व सरताज हे दोघेही गुजरातमधील असराली येथून कुरिअर घेऊन हैदराबादेतील समसाबादकडे जाण्यासाठी गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास निघाले. बीडकडे जात असताना झाल्टा फाट्यावरील अंबिका हॉटेलसमोर मध्यभागी ट्रक (टीएन-२४-एफ-४७२३) उभा होता. यावेळी सरताज यांचा कंटेनर डाव्या बाजूने उभ्या ट्रकवर आदळला.

हेही वाचा: उपविभागीय पोलिस अधिकारी १० लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

यात सरताज यांना किरकोळ तर फिरोज खान यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे फिरोज खान यांना सुरुवातीला खासगी आणि अधिक उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सरताज यांच्या तक्रारीवरुन ट्रक चालकाविरुध्द चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top