
मलिक अंबरनगरी : दिल्लीत शासनाच्या मदतीने भव्य दिव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. विद्रोही साहित्य संमेलनाला मात्र एकही रुपया नसताना त्यांनी दिल्लीच्या तोडीस तोड असे संमेलन येथे घडवून आणले, ही खरोखर वाखाण्याजोगी गोष्ट आहे. शासनाने विद्रोही साहित्य संमेलन करण्यासाठी देखील उदार अंतःकरणाने मदत करण्याची मागणी अभिनेते योगेश शिरसाट यांनी केली.