Dilip Walse Patil : आदर्श पतसंस्थेतील ठेवी परत देणार ;वळसे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

या बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.

आमदार हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र यापूर्वीच्या अधिवेशनात याच आशयाची लक्षवेधी मांडण्यात आली असल्याचा मुद्दा वळसे पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे विधिमंडळ कर्मचाऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचनाही वळसे-पाटील यांनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.