esakal | तरुणांनो तयार व्हा, सैनिकी सेवापूर्व संस्थेत दहावीच्या गुणांवर मिळणार प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

SPI

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत (एसपीआय) प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी (ता. २०) सुरुवात झाली आहे. यात ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्यांनी नोंदणी केली, त्यांनाच सहभागी होता येणार आहे.

तरुणांनो तयार व्हा, सैनिकी सेवापूर्व संस्थेत दहावीच्या गुणांवर मिळणार प्रवेश

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत (एसपीआय) प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी (ता. २०) सुरुवात झाली आहे. यात ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्यांनी नोंदणी केली, त्यांनाच सहभागी होता येणार आहे. यावर्षी प्रथमच एसपीआयसाठी प्रवेशपूर्व परीक्षा न होता दहावीच्या गुणांवर आधारित प्रवेश देण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत २०२०-२०२१ वर्षासाठी शालांत परीक्षेच्या गुणवत्ता क्रमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. एसपीआयमध्ये यावर्षी प्रवेशासाठी परीक्षा किंवा मुलाखती होणार नाहीत. दहावीच्या परीक्षेमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे. या आधारेच गुणवत्ता यादी तयार करून संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल येणार आहे.

वाचा : आई झाली भावूक, तहसीलदार मुलाने सहा महिन्यानंतर घेतली भेट

विषयांचे गुण संस्थेच्या संकेतस्थळावर भरायचे आहेत. चुकीचे गुण भरल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्याला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. गुणपत्रिकेचा फोटो सोबत जोडावयाच्या आहे. यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा आसन क्रमांक, विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, सर्व विषयांचे गुण, उत्तीर्ण-अनुत्तीर्ण शेरा हे स्पष्टपणे दिसले पाहिजे.


माहिती भरण्याची प्रक्रिया
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस २० ऑगस्टला सकाळी १० वाजता सुरू झाली. अंतिम तारीख ३१ ऑगस्टला रात्र दहा वाजेपर्यंत आहे. पुढची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
 

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top