

Adul Ganesh Visarjan
esakal
आडूळ, : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात शुक्रवारी (ता. २५) अनंत चतुर्दशीच्या दिवशी आडूळसह परिसरातील गणेशमूर्तींचे शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. भक्तीमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकांमध्ये गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.