Chhatrapati Sambhajinagar: आडूळच्या पाझर तलावाचा घसा सुकला; अवघा एक टक्का साठा शिल्लक; खोलीकरणासह टँकरची ग्रामस्थांची मागणी

Adul Pazhar Pond Crisis: पैठण तालुक्यातील आडूळ पाझर तलावात फक्त १% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अतिक्रमण, भिंतीचे नुकसान आणि अवैध पाणी उपशामुळे संकट वाढले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

आडूळ: पैठण तालुक्यातील आडूळ परिसरावर भीषण जलसंकटाचे सावट गडद झाले असून, गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पाझर तलावात अवघा एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जनावरांची तहान भागविण्यासाठी पशुपालकांना याच उरलेल्या पाण्यावर विसंबून राहावे लागत असून, पुढील आठ दिवसांत तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com