सरकार देशात आरजकता माजवण्याच्या प्रयत्नात : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

photo
photo

औरंगाबाद : देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून, त्याबद्दल केंद्र सरकारला चिंता वाटत नाही. आर्थिक परिस्थितीत हाताळण्यात केंद्राला अपयश येत आहे. हे अपयश लपविण्यासाठी देशात आरजकता माजवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

भटके विमुक्त आदिवासी परिषदेला संबोधीत करण्यापुर्वी सुभेदारी विश्रामगृह येथे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एनपीआर, एनआरसी आणि सीएए चा देशभरात विरोध होत आहे. केंद्र सरकार विरोध करणाऱ्यांना भिती घालण्यात येत आहे. आंदोलनात कोणी सहभाग घेतला त्यांची नावे नागरिकत्व कायद्यातून कायमची वगळण्यात येऊ शकतात, असे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळेच आंदोलन करणारी फळी कमकवुत होईल. 

परिस्थिती चिघळणार

साधारण एप्रिल- मे नंतर आणखी परिस्थिती चिघळेल असे त्यांनी सांगीतले. एस बँकेच्या पाठोपाठ लवकरच देशभरातील मोठ्या पाच बँका बंद होण्याचा मार्गावर आहेत, या सर्वच परिस्थितीत उठाव होण्यापुर्वीच आरजकता माजवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आसाम मध्ये नागरिकत्व कायदा लागू करत असताना १९ लाख २० हजार नागरिकांची विशेष कार्ड देण्यात आले आहे. या सर्वांची डिटेन्शन कँम्पमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यात १९ लाखांपैकी १४ लाख २० हजार नागरिक हिंदू आहे तर उर्वरित मुस्लिम आहे. हिंदूना नागरिकत्व कसे देणार हे सरकारने स्पष्ट करावे असे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. 

कोरोनाची भिती उभी केली जातेय

सरकारने कोरोनाची भिती उभी करत असून लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण नगन्य आहे. त्याचा बाऊ केला जात असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुशंगाने बोलताना ते म्हणाले की, संकट येत असतात, त्यामुळे निवडणुका स्थगीत करणे हा पर्याय नाही. प्रशासनाने मार्ग काढून महापालिकेच्या निवडणूका ठरलेल्या मुदतीत घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. धनराज वंजारी, प्रा. किसन चव्हाण, डाँ. नितीन सोनवणे, अमित भूईगळ, फारूख अहमद, अरुण जाधव, प्रभाकर बकाले, भरत दाभाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com