esakal | ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पोचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

"कलाग्राम' परिसरातील 32 एकरांत मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे (मासिआ) नऊ ते 12 जानेवारीदरम्यान सातवा "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महाएक्‍स्पोत 450 स्टॉलधारकांनी सहभाग नोंदविला आहे.

ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पोचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे (मासिआ) नऊ ते 12 जानेवारीदरम्यान सातवा "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.नऊ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता या एक्‍स्पोचे उद्‌घाटन होणार आहे. 


"कलाग्राम' परिसरातील 32 एकरांत एक्‍स्पो होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महाएक्‍स्पोत 450 स्टॉलधारकांनी सहभाग नोंदविला आहे. उद्‌घाटन कार्यक्रमास कॅबिनेटमंत्री संदिपान भुमरे, कॅबिनेट मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, महापौर नंदकुमार घोडेले, खासदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, आमदार अतुल सावे, आमदार विक्रम काळे, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

हेही वाचा- नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण...
उद्‌घाटन सत्रानंतर दुपारी तीन वाजता बीएफ डब्ल्यूची कॉन्फरन्स होणार आहे. यात "थिंक सोल्युशन्स मेकिंग मॅन्युफॅक्‍चरिंग कॉम्पिटिटिव्ह', "एनॅबिलिंग स्मार्ट मॅनिफॅक्‍चरिंग', कस्टमाईज्ड मॅन्युफॅक्‍चरिंग सोल्युशन्स या विषयावर चर्चासत्र होईल. त्यानंतर साडेचार वाजता एमएसएमईचे चर्चासत्र होणार आहे. 

ही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

विविध विषयांवर चर्चासत्र
महाएक्‍स्पोमध्ये लहान, मध्यम तसेच मोठ्या उद्योगांनी आपला सहभाग नोंदविला आहे. जगभर निर्यात होणारी शेकडो प्रकारची उत्पादने, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, अनोखे प्रयोग आणि अभिमान वाटावी अशी मराठवाड्यातील उद्योजकांची गरुडभरारी यातून प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनास राज्य शासन, पर्यटन विकास महामंडळ आणि केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, एमएसएमई राष्ट्रीय लघुउद्योगक निगम आणि राज्य शासनाचा उद्योग विभाग यांचे सहकार्य आहे. एक्‍स्पोत प्रदर्शनाशिवाय विविध विषयांवर चर्चासत्र होतील. भविष्यातील संधी, ऍग्रोप्रोसेसिंग, युवा संवादातून युवा राजकीय नेते, मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धीरज देशमुख यांचे मराठवाड्याविषयीचे व्हिजन तरुण उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना कळणार आहे. 
ही वाचा -  औरंगाबादचे पाणी तब्बल चारपट महाग

स्ट्रेंथ ऑफ मराठवाडा 

मेड इन इंडियातून उद्योजकांना प्रमोट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील उद्योजकांची काय क्षमता आहे, इथे कोणते उत्पादन, पार्ट तयार होतात, याची संपूर्ण माहिती देण्यासाठी एक्‍स्पोमधून मेड इन औरंगाबाद, मेड इन मराठवाडाची स्ट्रेंथ यातून सर्वांना दाखविण्यात येणार आहे. मराठवाड्यातून खऱ्या अर्थाने सीड हब, टेक्‍नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग, देशी-विदेशी प्रॉडक्‍शन, हेरिटेज मराठवाडा हे सर्व यातून दाखविण्यात येणार आहे. 

loading image