Aurangabad : मुलाचा जिवंतपणीच केला दहावा,सावत्र पित्याची उडाली भंबेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dashakriya ritual
Aurangabad : मुलाचा जिवंतपणीच केला दहावा,सावत्र पित्याची उडाली भंबेरी

Aurangabad : मुलाचा जिवंतपणीच केला दहावा,सावत्र पित्याची उडाली भंबेरी

वाळूज महानगर (जि.औरंगाबाद) : मुलगा कोरोना आजारामुळे मृत झाला, असे पत्नी व गल्लीतील लोकांना सांगून त्याचा विधीवत दहावा व तेरावा केला. मात्र तोच मुलगा तीन महिन्यानंतर अचानक अवतरल्याने सावत्र पित्याची भंबेरी उडाली. हा प्रकार वाळूज (Waluj) परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (ता.१६) उघडकीस आला आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ओमसाईनगरात राहणाऱ्या गोपाल सोनवणे (वय ५०) याच्या दुसऱ्या पत्नीचा पहिल्या पतीपासून (Aurangabad) झालेला विनायक हा मुलगा गतिमंद आहे. कोरोना काळाचा फायदा घेत या गतिमंद मुलाला सावत्र पित्याने घाटीत नेऊन सोडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. कोरोनाने (Covid) मृत झालेल्याचा मृतदेह घरी देत नाही, असे पत्नी व गल्लीत सांगून मुलाचा विधीवत दहावा व तेरावा केला. (After Three Months Son Found In Ghati Aurangabad Latest News)

हेही वाचा: Beed : धक्कदायक ! गर्भवती पत्नीसह पतीची फाशी घेऊन आत्महत्या

या घटनेला तब्बल तीन महिने उलटून गेले. मात्र याच गल्लीतील काही मुले घाटीत रिपोर्ट आणण्यासाठी गेले असता तो गतिमंद मुलगा तेथे त्यांना भेटला. हा मुलगा तर तीन महिन्यांपूर्वीच मृत झाला आहे, असे मनात विचार करत असतानाच त्याचा फोटो काढून मित्र व गल्लीत दाखवला. तो मृत असल्याचे सर्वांनी सांगितले. तरीही आपण खात्री करू, असे म्हणत अमोल शेवंतकर, शुभम दुसंगे, शेख हाफीस आणि संतोष पडघन हे त्याच्या वडिलांना घाटीत घेऊन गेले असता वडिलांना पाहून विनायक हा वडिलांच्या गळ्यात पडला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: वडिलांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला आणि मुलाने केली आत्महत्या

पोलीस निरीक्षकाची मदत

गतिमंद विनायक व त्याचे वडील गोपाल सोनवणे यांची भेट झाल्यानंतर सर्वजण वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले. घडलेला प्रकार ऐकल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी स्वतःच्या खिशातून हजार रुपये काढून देत या मुलाला नवीन कपडे घेऊन द्या व त्याचा सांभाळ करण्यास बजावण्यात आले.

हेही वाचा: Miss World 2021 Postponed! भारताच्या 'मानसा'सह अनेकांना ओमिक्रॉनची बाधा

पुन्हा अशी चुक नाही

यापुढे त्याचा चांगला सांभाळ करील, झालेली चूक मला मान्य आहे. मात्र यापुढे अशी चूक करणार नाही. त्याचा सर्व खर्च व सांभाळ करण्याची जबाबदारी माझी असून ती मी पूर्ण करील. असे आश्वासन विनायक या गतिमंद मुलाचे वडील सोनवणे यांनी दिले.

Web Title: After Three Months Son Found In Ghati Aurangabad Latest News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad News
go to top