Beed : धक्कदायक ! गर्भवती पत्नीसह पतीची फाशी घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Crime
Beed : धक्कदायक ! गर्भवती पत्नीसह पतीची फाशी घेऊन आत्महत्या

Beed : धक्कदायक ! गर्भवती पत्नीसह पतीची फाशी घेऊन आत्महत्या

नेकनुर (जि.बीड) : ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी (ता. बीड) येथे गर्भवती पत्नीसह पतीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१६) सायंकाळी समोर आली. राजेश भालचंद्र जगदाळे (वय २६) व दीपाली राजेश जगदाळे (वय २४) असे या दाम्पत्याचे नाव असून त्यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झालेले (Beed) आहे. राजेश जगदाळे याचा विवाह वर्षभरापूर्वी गावातीलच दीपाली डिसले हिच्यासोबत झाला होता. सध्या दीपाली काही महिन्यांची गर्भवती होती. त्यांचा संसारही सुरळीत सुरु असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी (Crime In Beed) दोघांचे कुटूंबिय शेतात गेले. यावेळी राजेश व पत्नी दीपाली हे दोघेच घरी होते. दुपारी नातेवाईक गावातील एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून त्यांनी आवाज दिला. (Beed Crime News Husband Hanged Himself Along With Wife In Neknoor)

हेही वाचा: शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

मात्र, उशिरापर्यंत कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने दार तोडून आत प्रवेश केला असता दीपाली जगदाळे याचा मृतदेह खाटावर पडलेला होता. तर, राजेश जगदाळेचा मृतदेह घराच्या लोखंडी आडुला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, परमेश्वर सानप, प्रशांत क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेकनूरच्या कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर या दोघांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.