
Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : पर्शियन नजाकत आणि भारतीय कलाकुसर असा अफलातून संयोग असलेले ‘हिमरू’ वस्त्र छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. आता या हिमरूच्या डिझाइनचा वापर बोइंग ७३७ विमानाच्या शेपटीवर करण्यात आला. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ताफ्यातील विमानाच्या शेपटीवर हे डिझाइन साकारण्यात आले.