

Sakal
‘‘हवाप्रदूषणामुळे श्वसन विकार होतात. मात्र या प्रदूषणाचा आता थेट शरीर आणि मनावरही परिणाम होऊ लागला आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी समाज माध्यमातून केला. वाढते वायू प्रदूषण ही गंभीर राष्ट्रीय संकट बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात (एनसीएपी) व्यापक बदल केले जावेत तसेच २००९ च्या हवा गुणवत्ता मानकांमध्ये सुधारणा केली जावी, अशी मागणी रमेश यांनी केली आहे.