

Ajanta Caves
sakal
फर्दापूर : मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये २९ ऑक्टोबरला ‘इंडिया मेरीटाइम वीक’मधील मेरीटाइम लीडर्स परिषद झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्राचीन सागरी परंपरेचा उल्लेख करताना अजिंठा लेणीतील भित्तिचित्रांमध्ये दर्शविलेल्या जहाज बांधणीचा उल्लेख केला. यामुळे लेणीतील भित्तिचित्रांमधील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.