

Chhatrapati Sambhajinagar
esakal
फर्दापूर: छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटात रविवारी (ता. तीन) दुपारी दोनपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. तब्बल बारा तासांच्या खोळंब्यानंतर सोमवारी मध्यरात्री पोलिस प्रशासनाच्या प्रयत्नांनी वाहतूक संथगतीने सुरू झाली. या कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, महिला आणि विदेशी पर्यटकांना रात्रभर घाटातच ताटकळत राहावे लागले.