छत्रपती संभाजीनगर - दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग असलेल्या विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शहरातील प्रोझोन मॉल येथे करण्यात आले. याप्रसंगी महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, नीलेश राऊत, डॉ. रेखा शेळके, प्रा. शिव कदम आदींची उपस्थिती होती.